मोक्का कारवाईपासून वाचण्यासाठी २ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अटकेत

 


पुणे : पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मागील २ वर्षांपासून मोक्का कायद्याखाली कारवाई पासून वाचण्यासाठी फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे.

सिद्राम उर्फ अभी रमेश मंजिली, वय २४ वर्षे, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे असे या आरोपीचे नाव आहे.

शहरातील फरारी आरोपींचा शोध गेत असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा, खंडणीविरोधी पथक १ मधील राजेंद्र लांडगे यांना आरोपी सिद्राम सोलापूर शहरात आपली ओळख लपवून रहात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सोलापूर येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.

त्याला वारजे पोलीसठाण्यात १५/२०२२ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३०७,५०४, ५०६, ३४ आर्म अॅक्ट ४ (२५), मोक्का ३ (१) (२), ३(२), ३(४) अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासकामी व पुढील कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई  पोलीस आयुक्त अमितेश कुमार,  सहआयुक्त, प्रवीण पवार, अपर आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उपआयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायकआयुक्त १ गुन्हे सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या सूचनेप्रमाणे उप निरीक्षक यशवंत ओंबासे, अंमलदार राजेंद्र लांडगे, अमोल आवाड, सयाजी चव्हाण,अमर पवार व प्रविण ढमाळ यांनी केली.

मोक्का कारवाईपासून वाचण्यासाठी २ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अटकेत मोक्का कारवाईपासून वाचण्यासाठी २ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अटकेत Reviewed by ANN news network on ३/१५/२०२४ ०९:०२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".