पुणे : प्रवाशांची जादा गर्दी लक्षात घेता रेल्वेने हुबळी-अहमदाबाद-हुबळी होळी स्पेशल ट्रेन २ ट्रीप चालवण्याचा निर्णय घेतला आहे.ही माहिती रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिली.
या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
हुबळी-अहमदाबाद-हुबळी
गाडी क्रमांक 07311 हुबळी-अहमदाबाद स्पेशल एक्स्प्रेस दिनांक 24.3.2024 रोजी हुबळीहून 19.30 वाजता सुटेल आणि दिनांक 25.3.2024 रोजी मिरजला 02.20 वाजता पोहोचेल आणि 02.25 वाजता सुटेल, सांगलीला 02.37 वाजता पोहोचेल आणि 02.40 वाजता सुटेल, सातारा 04.57 वाजता पोहोचेल आणि 05.00 वाजता निघेल, पुणे 08.05 वाजता पोहोचेल आणि 08.15 वाजता सुटेल, कल्याण 10.47 वाजता पोहोचेल आणि 10.50 वाजता सुटेल आणि दिनांक 25.3.2024 रोजी अहमदाबादला रोजी 19.20 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07312 अहमदाबाद - हुबळी एक्स्प्रेस अहमदाबादहून दिनांक 25.3.2024 रोजी 21.25 वाजता सुटेल आणि कल्याणला दिनांक 26.3.2024 रोजी 05.20 वाजता पोहोचेल आणि 05.23 वाजता सुटेल, पुण्याला 08.05 वाजता पोहोचेल आणि 08.15 वाजता सुटेल, सातारा येथे 10.50 वाजता पोहोचेल आणि 10.55 वाजता सुटेल, सांगलीला 12.50 वाजता पोहोचेल आणि 12.55 वाजता सुटेल, मिरज येथे 13.30 वाजता पोहोचेल आणि 13.35 वाजता सुटेल आणि हुबळी येथे दिनांक 26.3.2024 रोजी 19.45 वाजता पोहोचेल.
थांबे : धारवाड, लोंडा, बेळगावी, घटप्रभा, मिरज, सांगली, सातारा, पुणे, कल्याण, वसई रोड, बोईसर, वापी, सुरत, वडोदरा आणि आणंद.
रचना: एकूण 19 ICF कोच:- एक AC-2 टियर, दोन AC-3 टियर, 08 स्लीपर क्लास, 07 सामान्य द्वितीय श्रेणी सहित दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन, एक पँट्री कार.
विशेष गाडीचे सविस्तर थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
हुबळी आणि अहमदाबाद दरम्यान होळी विशेष गाड्या
Reviewed by ANN news network
on
३/२०/२०२४ ०८:४५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/२०/२०२४ ०८:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: