मुंबई : एकेकाळी काँग्रेसचे मुंबईतील वजनदार नेता आणि उत्तरभारतीयांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे कृपाशंकर सिंह यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांच्यावर म्हणावी अशी महत्त्वाची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली नव्हती. यामुळे ते राजकीय विजनवासात गेले आहेत असे वाटत असतानाच भाजपच्या नेत्यांनी त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना उत्तरप्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारी मिळाल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. फडणवीस यांनी त्यांचे शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी अॅड.अखिलेश चौबे आणि उद्योजक विजय यादव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा