मलबार हिल पोलिसांची कामगिरी
मुंबई : मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू वसतीमध्ये १२ मार्च रोजी दुपारी एका वृद्ध महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला होता. मृत महिलेल्या हातात असलेल्या सुमारे ३ लाख रुपये किमतीच्या हिरेजडित बांगड्या नाहीशा झाल्या होत्या. या कुटुंबात काम करणारा नोकर पसार झाला होता. या प्रकरणी मृत महिलेल्या पतीने मलबार हिल पोलीसठाण्यात तक्रार नोंदविली होती. या प्रकरणाचा तातडीने तपास करत २४ तासांच्या आत मलबार हिल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कन्हय्याकुमार संजय पंडित असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मुकेश गुलाबचंद शहा, वय ६७,तानिया हाईट्स, ६६ नेपियन सी रोड, मलबार हिल मुंबई यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या पत्नी ज्योती मुकेश शहा वय ६७ यांचा १२ मार्च रोजी सुपारी दीड ते सायंकाळी सहा या दरम्यान आरोपीने गळा आवळून खून केला. आणि, त्यांच्या हातातील सुमारे ३ लाख रुपये किमतीच्या बांगड्या घेऊन तो पसार झाला होता.
मलबार हिल पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्यासाठी १५ पथके स्थापन केली होती. या पथकांनी कसोशीने तपास करून आरोपीला भुसावळ येथून ताब्यात घेतले. जळगाव जिल्हा पोलीस रेल्वे सुरक्षा बल, भुसावळ व जी. आर. पी. भुसावळ यांनी यासाठी पोलिसांना सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा