आर्किटेक्ट आशीष केळकर यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये
पुणे : शहरांमधील मोकळ्या जागांच्या संरक्षणा
'शहरातील अनियंत्रित वाढीमुळे शहरांमधील मोकळ्या जागा,पर्यावरण पाण्याची गुणवत्ता,हवा आणि सांडपाणी व्यवस्थापन धोक्यात आले असून तेथील मोकळ्या जागांच्या संरक्षणासा ठी धोरणात्मक बदल केल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही',असे ' इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्रिएटीव्ह रिसर्च थॉट्स' मध्ये प्रकाशित संशोधनात आशीष केळकर यांनी म्हटले आहे.
'दर्जेदार मोकळ्या जागा ही शहरात चंगळ न राहता निकड बनली आहे.मेट्रो शहरांमधील विशेषत: मुंबईतील मोकळ्या जागांचे संरक्षण करण्यासाठी सध्याच्या धोरणात्मक साधनांना सक्षमीकरणाची नितांत गरज आहे.शहरातील नागरिक विशेषत: गरिबांच्या जीवनमानावर त्याचा परिणाम होत आहे',असे या शोधनिबंधात त्यांनी नमूद केले आहे.
'मोकळ्या जागेतील लोकांच्या सामाजिक संवादामुळे व्यवसाय वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे शहरे वाढतात.तथापि,भारतीय शहरांमध्ये मनोरंजन आणि विश्रांतीच्या सध्याच्या कल्पनेत बदल झाला आहे.ही कल्पना इनडोअर स्पेसभोवती फिरते आणि त्यासाठी पैसे दिले जातात. दर्जेदार मोकळ्या जागा ही चंगळ (लक्झरी) बनली आहे.नितांत गरज आहे आणि विशेषत: गरिबांना त्रास देत आहे.मुंबईतील निम्म्याहून अधिक शहरी लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत असल्याने,तेथे राहणाऱ्यांच्या जीवनमानावर मोकळ्या जागांच्या कमतरतेमुळे परिणाम होत आहे.
जमिनीच्या वापर(लँड युज) बदलल्याने आणि अनियंत्रित नागरी विस्तारामुळे पर्यावरण,घरांची उपलब्धता,पाणी गुणवत्ता,हवेचा दर्जा,कचरा व्यवस्थापन या परिणाम झाला आहे.संशोधनानुसार,मुंबईतील हरित आच्छादन १९७३ मध्ये ५३.६३ टक्क्यांवर घसरले,२००९ मध्ये ३३.७६ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.याचा अर्थ ६२ टक्के हरित आच्छादन आपण गमावले आहे.याच कालावधीत बिल्ट-अप एरिया १५५ टक्क्यांनी वाढला आहे.
'दरडोई शहरी मोकळी जागा सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे सक्षम धोरण महत्त्वाचे आहे.मुंबईतील मोकळ्या जागांचे संरक्षण करताना साधनांना सक्षमीकरणाची गरज आहे. स्मार्ट शहरांबरोबर बरोबरच स्मार्ट व्हिलेजच्या विकासात व्यापक आणि अधिक मूलगामी धोरणांची गरज आहे.शहर पातळीवरील छोट्या सुधारणा धोरणांव्यतिरिक्त स्मार्ट व्हिलेजेस निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे.शहरांमधील पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे.ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी आणि स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी ग्रामीण स्तरावर रोजगार निर्माण केला पाहिजे.स्वावलंबी खेड्यांची रा
शहरांमधील मोकळ्या जागांच्या संरक्षणावर संशोधन
Reviewed by ANN news network
on
३/२९/२०२४ ०३:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: