'काय करावे, काय करु नये' राजकीय पक्षांना सविस्तर मार्गदर्शन

 


आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : एम देवेंदर सिंह

रत्नागिरी  : आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे, काय करु नये, नामनिर्देशनपत्र कसे भरावे, याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शन केले. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबाबतही त्यांनी आवाहन केले.

     जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. 

     जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, भारत सरकारच्या पोर्टलवर याबाबत सर्व सविस्तर माहिती आहे. त्याचाही संदर्भ म्हणून वापर करावा. विशेषत: नामनिर्देशनपत्राबाबत आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. वयस्कर तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे. राजकीय पक्षांनी बुथनिहाय प्रतिनिधी नेमावेत. सर्वांनीच आचारसंहितेचे काटेकारे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1950

   लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे याबाबत काही तक्रारी असतील तर जिल्ह्याच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील 1950 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. हा कक्ष 24 तास सुरु आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले. 

जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी काल 8 प्रकारचे आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे सर्वांनी काटेकोर पालन करावे. त्यानुसारच परवानगीदेखील घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले.        

      यानंतर खर्चाचे दर ठरविण्याबाबत बैठक झाली. बैठकीला जिल्हा परिषदचे वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त डी. आर. शिंदे, कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त इनुजा शेख आदी उपस्थित होते.

'काय करावे, काय करु नये' राजकीय पक्षांना सविस्तर मार्गदर्शन 'काय करावे, काय करु नये' राजकीय पक्षांना सविस्तर मार्गदर्शन Reviewed by ANN news network on ३/१८/२०२४ ०८:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".