विठ्ठल ममताबादे
उरण : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२२ - २०२३ मध्ये एम कॉम, बी कॉम, बीए व बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स या विविध शाखेत पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सुभोजीत बोस ( कार्यकारी संचालक आणि प्लांट मॅनेजर ओएनजीसी उरण प्लांट उरण) हे होते. त्यांनी हा क्षण विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असून, कष्ट आणि समर्पणाच्या बळावर विद्यार्थ्यांनी जीवन यशस्वी करावे असे सांगितले. व आयुष्यात ध्येय निश्चित करून त्या दिशेने मार्गक्रमण करावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नवीन राजपाल (सदस्य, महाविद्यालय विकास समिती) हे होते. आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. प्राचार्य के.ए. शामा यांनी समाधान हीच यशाची चावी असून इतरांच्या जीवनातील दुःख आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे व अंतर्मन जागृत ठेवून जगले पाहिजे असे प्रतिपादन केले. तसेच भावी आयुष्यासाठी उपस्थित पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पदवी व पदयुत्तर अशा एकूण १२५ विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पदवी वितरित करण्यात आल्या.
याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विशाल पाटेकर, ज्येष्ठ प्रा. व्ही.एस इंदुलकर, आय.क्यू.ए.सी समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुमारी हन्नत शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. पराग कारुळकर यांनी दिला तर उपस्थितांचे आभार डॉ.दत्ता हिंगमिरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
उरण महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ साजरा
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२४ ०८:३०:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२४ ०८:३०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: