विठ्ठल ममताबादे
उरण : मंत्री अदिती तटकरे यांचा वाढदिवस विविध ठिकाणी सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
खासदार सुनील तटकरे व मंत्री अदिती ठाकरे यांना मानणारा उरण तालुक्यात खूप मोठा वर्ग आहे.उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट )यांच्यातर्फे तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील चिरनेर आश्रमशाळा मध्ये विद्यार्थ्यांना वही पेन या शैक्षणिक साहित्याचे व खाऊ वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे हा कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे उरण तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर,तालुका उपाध्यक्ष दिनेश पाटील,विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, महिला अध्यक्ष कुंदा ठाकूर, युवक अध्यक्ष समद भोंबले,जेष्ठ कार्यकर्ते संतोष ठाकूर, रत्नाकर म्हात्रे, चिरनेर आश्रमशाळाचे मुख्याध्यापक अप्पासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा