पनवेल : पनवेल येथील तहसील कार्यालयातील महसूल सहायकाला ४० हजार रुपयांची लाच घेताना नवी मुंबई अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने १४ मार्च रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता पकडले. यामुळे पनवेल तहसील कार्यालयात खळबळ माजली आहे.
किरण अर्जुन गोरे, वय- ४८ वर्षे, महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय, पनवेल, जि. रायगड असे अटक करण्यात आलेल्या कर्मचार्याचे नाव आहे.
या प्रकरणी नवी मुंबई अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालयाकडे तक्रार देणार्या व्यक्तीने त्याची कुळकायद्याखालील वडिलोपार्जित जमीन भोगवटादार वर्ग १ म्हणून नोंद करून मिळावी यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. हे काम करण्यासाठी किरण गोरे याने ८० हजार रुपयांची लाच त्याच्याकडे मागितली. त्यापैकी ४० हजार रुपये स्वीकारताना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने १४ मार्च रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता त्याला 'रंगेहाथ' पकडले.
ही कारवाई ठाणे परीक्षेत्राचे अधिक्षक सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने केली.
Reviewed by ANN news network
on
३/१५/२०२४ ०१:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: