पुणे : पुणे विभागात रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार 8 मार्च 2024 रोजी "आंतरराष्ट्रीय महिला दिन" साजरा करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील इंद्रायणी हॉलमध्ये मुख्य कार्यक्रम झाला. ही माहिती रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यानी दिली.
यावेळी विविध विषयांतील आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ पाहुण्यांना आमंत्रित करून त्यांची हृदयाची कार्यप्रणाली सुधारण्यात होमिओपॅथीची भूमिका, सोशल मीडियाचा समाजावर होणारा परिणाम, सकारात्मक जीवन जगण्याची कला इत्यादी विषयांवर व्याख्याने देण्यात आली.
तसेच या कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या छेडछाडीबाबत जनजागृतीसाठी पुस्तिकेचे प्रकाशन केले.
यावेळी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून यामध्ये विभागातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सदर कार्यक्रमात मंडळाच्या महिला कर्मचारी व महिला समाज सेवा समितीच्या सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
मध्य रेल्वे मुख्यालय - मुंबई येथे आयोजित एका विशेष समारंभात मुख्यालय आणि विविध विभागांमध्ये कार्यरत 21 महिला कर्मचाऱ्यांना सशक्त नारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पुणे विभागात कार्यरत असलेल्या दोन महिला कर्मचारी, तंत्रज्ञ- I स्नेहा कांबळे आणि कनिष्ठ तिकीट निरीक्षक. पूजा तेलगोटे यांना सक्षम महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Reviewed by ANN news network
on
३/०८/२०२४ ०९:३७:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: