भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत 'स्वर स्नेहांकित ' या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अबीर इव्हेन्ट ही संस्था सादर करणार आहे.गौरी गोळे-लिमये या गायन सादर करणार आहेत.अदिती गराडे(संवादिनी),अवधूत धायगुडे(तालवाद्य),अक्षय शेवडे(तबला) हे साथसंगत करणार आहेत. हर्षद लिमये निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमात मानवी आयुष्यातील नात्यांचा सुरेल शोध भावसंगीत,नाट्य संगीत आणि भक्ती संगीताच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.
हा कार्यक्रम शनिवार,२३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १९९ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा