रविवार, ३१ मार्च, २०२४

पुणे ते दानापूर एकेरी विशेष गाडी

 


पुणे : रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एकेरी  विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-


 पुणे- दानापूर एकेरी विशेष

गाडी क्रमांक 01499 पुणे- दानापूर एकेरी विशेष गाडी दिनांक 30.3.2024 ला पुण्याहून 19.55 वाजता सुटेल आणि दानापूरला तिसऱ्या दिवशी 04.30 वाजता पोहोचेल.

थांबे:- दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

कोचरचना: एकूण 22 आयसीएफ कोच:-  20 स्लीपर  क्लास, दोन सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.

आरक्षण: गाडी क्रमांक 01499 साठी बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर दिनांक 30.3.2024 रोजी 13.00 वाजता सुरू होईल.

विशेष गाड्यांच्या तपशीलवार थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.  

प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा