पुणे : वसंत ऋतूचे आगमन,होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर 'स्वर धरोहर' संस्थेतर्फे 'स्वर बसंत' ही गानमैफल आयोजित करण्यात आली आहे.शनिवार,दि.२३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात (लॉ कॉलेज रस्ता)ही मैफल होईल.डॉ.रेवा नातू आणि गौरी पाठारे या मैफिलीत शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन सादर करणार आहेत.त्यांना तबल्यावर रोहित देव आणि हार्मोनियमवर लीलाधर चक्रदेव साथसंगत करणार आहेत.प्रवेश विनामूल्य आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा