काही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार
पुणे : मध्यरेल्वेच्या पुणे विभागातील पुणे मिरज मार्गावर जरंडेश्वर ते सातारा या टप्प्यात लोहमार्गाचे दुपदरीकरण चालू आहे. त्या अनुषंगाने २६ ते २९ मार्च पर्यंत या टप्प्यामध्ये ब्लॉक असणार आहे.
यामुळे २६ मार्च रोजी धावणार्या ०१४३ पुणे-मिरज एक्सप्रेस आणि ०१४२४ मिरज-पुणे एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून २६ आणि २९ मार्च रोजी सुटणारी ११०३० कोल्हापूर मुंबई कोयना एक्स्प्रेस कोल्हापूरहून तिच्या नियमीत वेळेत म्हणजेच सव्वाआठ वाजण्या ऐवजी पावणेदहा वाजता म्हणजेच दीडतास उशिरा सुटणार आहे.
गाडी क्रमांक १२१४७ कोल्हापूर- छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून २६ मार्च रोजी सुटणारी हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस कोल्हापूरहून तिच्या नियमित सुटण्याच्या वेळेत म्हणजेच ९ वाजून १० मिनिटांनी सुटण्याऐवजी पावणेअकरा वाजता म्हणजेच दीडतास उशिरा सुटेल.
२७. २८ आणि २९ मार्च रोजी कोल्हापूर येथून सुटणारी गाडी क्रमांक ११४२६ कोल्हापूर-पुणे डेमू छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून तिच्या नियमित वेळेत म्हणजेच ५ वाजता सुटण्याऐवजी ७ वाजता अर्थात दोन तास उशिरा सुटेल.
दादर, मुंबई येथून २५ मार्च रोजी सुटणारी गाडी क्रमांक ११०२७ दादर सातारा एक्सप्रेस या गाडीचे १ तासासाठी नियमन केले जाईल.
हा मेगा ब्लॉक दुहेरीकरण, पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: