शुक्रवार, ८ मार्च, २०२४

राष्ट्रवादीतर्फे पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक महिला दिन साजरा

 


पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सामाजिक न्याय महिला विभागाच्या वतीने  ०८ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता, मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून "जागतिक महिला दिन" साजरा करण्यात आला.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे व महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.  

पुनम अनंत अंभिरे यांनी अत्यंत गरिब परिस्थ‍ितीतून मेहनतीने मुलीचे श‍िक्षण पूर्ण करून तिला परभणी जिल्हा आरोग्य अधिकारी पदापर्यंत पोहचविले. गवळण रोहिदास कांबळे यांनी आपल्या मुलाचे अत्यंत हलाखीच्या परिस्थ‍ितीतून वकीलीचे शिक्षण पूर्ण करून त्यास सक्षम केले. ज्योती डोळस या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहेत. या महिलांचा सन्‍मान करण्यात आला.

यावेळी ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय लोखंडे,महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, महिला मुख्य संघटक पुष्पा शेळके, अर्बन सेल अध्यक्षा मनीषा गटकळ, बचत गट महासंघ अध्यक्ष ज्योती गोफणे, महिला उपाध्यक्ष आशा शिंदे यांनी महिलांसाठी सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध संधी व त्या संधीचा लाभ कसा घ्यावा याबाबत माहिती दिली.

सदर कार्यक्रमास शहर कार्याध्यक्ष फजल शेख, साफसफाई कामगार अध्यक्षा सुवर्णा निकम, मेघा पळशीकर, वंदना कांबळे, आशा मराठे, वर्षा शेडगे, रतन जगताप, भारती काळभोर, रजनी गोसावी, सुवर्णा निकम, अनिता गायकवाड यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा