स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 


पिंपरी : मावळातील आंबेवाडी येथे असलेल्या स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचा तिसरा वर्धापनदिन १० मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.  कार्यक्रमाला 'तुझ्यात जिव रंगला फेम', 'राणादा' सिने-नाट्य कलावंत हार्दिक जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानिमित्ताने 'व्यसनमुक्तीतून स्वप्नपूर्तीकडे' आणि 'समाजकार्यातून स्वप्नपूर्तीकडे' या पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणेरी पगडी, शाल आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वर्षी 'व्यसनमुक्तीतून स्वप्नपुर्तीकडे' हा पुरस्कार संजय कोठारी वराहुल जाधव यांना तसेच,  'समाजकार्यातून स्वप्नपुर्तीकडे' हा पुरस्कार सारंग राजवाडे व रविंद्र बिरारी यांना देण्यात आला.

कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे उपाध्यक्ष  किरण ओसवाल यांनी यावेळी आपले विचार मांडले. टेक्नोवेस पेंट्सचे डायरेक्टर निखिल महापात्रा, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष दिपक फल्ले, रोटेरीयन प्रदिप टेकवडे, प्रदीप मुंगसे,  प्रशांत ताये,  संतोष परदेशी, रितेश फाकटकर, उर्से गावचे समाजिक कार्यकर्ते  मारुती कारके आदी यावेळी उपस्थित होते. 

स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हर्षल पंडित यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना त्यांनी स्माईल उभे करत असतांना आलेल्या अडचणी त्यावर मात करत उभी असलेली स्माईलची इमारत या बद्दल सांगितले व सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद दिले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्माईलचे प्रकल्प समन्वयक  नितीन नाटेकर,  प्रणव देशमुख,  हर्षल जोशी, राहुल केळकर, राहुल बोरुडे, रोहन यादव,  आनंद भागवत,  दुर्गा दर्जी,  अनिल सावंत,  प्रकाश धिडे व स्माईलच्या सर्व कार्यकर्त्यांनी यांनी परिश्रम घेतले. 

हर्षल जोशी यांनी आभार मानले. 


स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात साजरा स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात साजरा Reviewed by ANN news network on ३/११/२०२४ ०१:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".