सार्वजनिक मालमत्ता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विद्रूप करण्यास निर्बंध

 


रत्नागिरी  : निवडणुकीच्या कालावधीमध्ये शासकीय / निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपता करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. 06.06.2024 पर्यंत) निर्बंध घातल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

     भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दिनांक 16 मार्च रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनाकांपासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. काही व्यक्ती/संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधी राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधीत व्यक्ती/संस्था यांचेकडून होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीराती लावुन शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मा. भारत निवडणूक आयोगाने मालमत्ता विद्रुपीत करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित केल्यानुसार नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणुकीच्या कालावधीमध्ये होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिरात प्रदर्शीत करतांना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते दूर (नष्ट) करुन इमारती, मालमता पूर्ववत करुन घेणे, जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह, यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निवडणुकीच्या कालावधीमध्ये शासकीय / निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुता करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. 06.06.2024 पर्यंत) निर्बंध घातल्याचे आदेश दिले आहेत. 

सार्वजनिक मालमत्ता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विद्रूप करण्यास निर्बंध सार्वजनिक मालमत्ता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विद्रूप करण्यास निर्बंध Reviewed by ANN news network on ३/१७/२०२४ ११:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".