बुधवार, १३ मार्च, २०२४

कुख्यात गुन्हेगारासह त्याच्या साथीदार महिलेवर मोक्का कारवाई

पुणे : हडपसर परिसरातील एका कुख्यात गुन्हेगारासह त्याच्या सहकारी महिलेवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.तसे आदेश अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर प्रविणकुमार पाटील यांनी दिले आहेत.

अमित नाना चव्हाण, वय २७ वर्ष, हडपसर पुणे  व नेहा बबन सोनवणे, वय २० वर्ष, रा. ओटास्किम, निगडी, पुणे अशी या दोघांची नावे आहेत. 

७ फेब्रुवारी रोजी ५ वाजून २० मिनिटांनी पुण्यातून चिंचवडकडे जाणार्‍या पीएमपीएमएल बसमध्येएका महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कटरच्या सहायाने तोडून ती हिसकावून पळून जात असताना या दोघांना अटक करण्यात आली होती. शिवाजीनगर पोलीसठाण्यात या प्रकरणी ४१/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. दोन्ही आरोपी एकमेकांच्या साहायाने गुन्हेगारी कृत्ये करीत असून त्यांच्याविरोधात पुणे शहरामध्ये चोरी करणे, दरोडा टाकणे, दुखापत करणे, हत्याराचा धाक दाखवून लुटणे, विनापरवाना घातक हत्यार जवळ बाळगणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे अशा गुन्ह्यांची नोंद आहे. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांनी वारंवार गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२), ३(४) चा अंतर्भाव करावा असा प्रस्ताव शिवाजीनगर पोलीसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक  चंद्रशेखर सावंत यांनी  सदिपसिंह गिल, उपआयुक्त, परि ०१, पुणे शहर, यांच्या मार्फत प्रविणकुमार पाटील अपर आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे  यांच्याकडे सादर केला होता. त्याला अपर आयुक्तांनी मान्यता दिली आहे.


ही कारवाई  पोलीस आयुक्त अमितेश कुमार,  सह आयुक्त  प्रवीण पवार,  अपर आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर  प्रवीणकुमार पाटील, उपआयुक्त, परीमंडळ १, पुणे शहर, संदिपसिंह गिल, सहायक आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे शहर,  साईनाथ ठोंबरे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ  निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे,  चंद्रशेखर सावंत सहायक निरिक्षक कैलास डाबेराव,उपनिरीक्षक अजित बडे, अंमलदार संतोष मेमाणे, रोहित झांबरे, दिलीप नागरे, नलिनी क्षीरसागर, सोलेहा शेख यांनी केली.गुन्हयाचा पुढील तपास सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे करीत आहेत. 


२०२४ या  वर्षातील मकोका अंतर्गत केलेली ही १५ वी कारवाई आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा