पिस्तुलधारी तडीपार गुंडांसह तिघे अटकेत; दीडलाखाचा मुद्देमाल जप्त

चार गुन्हे उघडकीस

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड पोलीसठाण्याच्या पथकाने एका तडीपार गुंडाला अटक करून त्याच्याकडून एक पिस्तुल जप्त केले आहे.त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.यामुळे चार घरफोड्यांची प्रकरणे उघडकीस आली असून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात ३ मोबाईल फोन, ९ मनगटी घड्याळे, नवीन कपडे, परफ्युम्स यांचा समावेश आहे.

सुनिल मारुती लोणी, वय २२ वर्षे, राहणार बिजलीनगर, नलावडे वस्ती, रेलविहार शेजारी, चिंचवड असे अटक करण्यात आलेल्या या तडीपार आरोपीचे नाव असून प्रथमेश मुकुंद मोदी, वय २२ वर्षे, राहणार सुगम हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे,सौरभ दत्तात्रय शिंदे, वय २३ वर्षे, राहणार श्रीराम कॉलनी, बळवंतनगर, चिंचवड यांनाही अटक करण्यात आली आहे.

या तिघांच्या अटकेमुळे चिंचवडमधील २ आणि वाकडमधील २ असे ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

 ही कामगिरी  पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,  अपर  आयुक्त साो. वसंत परदेशी, उपआयुक्त, परिमंडळ १  स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त चिंचवड विभाग राजू मोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी, तपास पथकातील उपनिरीक्षक आर. जे. व्हरकाटे,उपनिरीक्षक ए. बी. दुधे, सहायक फौजदार पांडुरंग जगताप, हवालदार धर्मनाथ तोडकर, संतोष गायकवाड,भाग्यश्री जमदाडे, शिपाई रोहीत पिंजरकर, उमेश मोहीते, रहीम शेख, पकंज भदाणे, गोविंद डोके, अमोल माने, जितेंद्र उगले, उमेश वानखडे, यांनी केली.


पिस्तुलधारी तडीपार गुंडांसह तिघे अटकेत; दीडलाखाचा मुद्देमाल जप्त  पिस्तुलधारी तडीपार गुंडांसह तिघे अटकेत; दीडलाखाचा मुद्देमाल जप्त Reviewed by ANN news network on ३/१४/२०२४ ०१:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".