मुंबई : मुंबई पोलीस गुन्हेशाखेच्या मालमत्ताकक्षाच्या पथकाला एका बांगलादेशी घरफोड्यांच्या टोळीस जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. ही टोळी विमानाने प्रवास करून महाराष्ट्र, गुजराथ, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यात घरफोड्या करत होती.या टोळीतील ६ जणांना परतूर, जि. जालना येथून अटक करण्यात आली आहे.
२०२२ साली मुंबईत झालेल्या घरफोडीचा तपास पोलीस करत होते. या प्रकरणात सराईत गुन्हेगार शाकीर उर्फ गुड्डू हैदर शेख वय ४५ याचा पोलीस शोध घेत होते. तो वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत होता. तसेच, मोबाईल सिमकार्डही बदलत होता. त्यामुळे त्याला शोधणे पोलिसांसमोर आव्हान होते. या आरोपीचा सलग १ वर्ष महाराष्ट्र, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल राज्यात तांत्रिक तपास चालू होता. हा आरोपी ७ मार्च रोजी परतूर, जि. जालना येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांचे एक पथक मुंबईहून तातडीने जालना येथे गेले. ८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास परतूर येथील एका दुमजली घरावर छापा घालून पथकाने शाकीर शेख आणि त्याचे साथीदार अशा ६ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून क्वीड कार, कटावनीणी, स्क्रूड्रायव्हर, चॉपर, कोयता असा मुद्देमालही जप्त करण्यात आला. तपासात शाकीर शेखसह त्याचे चार साथीदार बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही टोळी चोरी केल्यावर पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात पळून जात असे. त्यामुळे त्यांना पकडणे कठीण होते.
या टोळीचा प्रमुकह शाकीर शेख हा सराईत गुन्हेगार आहे.पू र्वी अटक असलेल्या गुन्हयापैकी ४ गुन्हयांमध्ये त्याला सजा झाली असून, ०८ गुन्हयात अजामिनपात्र वॉरंट, १ गुन्हयात जामीनपात्र वॉरंट व १ गुन्हयात जाहिरनामा प्रस्तावित करण्यात आला आहे.
या टोळीच्या अटकेमुळे मुंबईतील १८ गुन्हे, भुसावळ व जालना जिल्हयातील ०३ गुन्हे, तसेच तेलंगणा निजामाबाद येथील १३ गुन्हे, तेलंगणा - हैदराबाद येथील ०७ गुन्हे, गुजरात-अहमदाबाद येथील ०४ गुन्हे, पश्चिम बंगाल - हावडा, वर्धमान याठिकाणी केलेले ०७ गुन्हे असे ५३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयक्त (डी विशेष) दत्तात्रय नाळे यांच्या देखरेखीखाली मालमत्ता कक्ष, गु.प्र.शा., मुंबई या कक्षाचे प्रभारी निरीक्षक शशिकांत पवार, निरीक्षक संदिप निगडे, सहायक फौजदार उमेश राऊत, हवालदार अरुण सावंत, चिंतामण इरनक, तुषार सावंत, विनोद पदमन, विश्वनाथ पोळ, सचिन सावंत, संतोष औटे, शिपाई आदित्य जाधव, रंजना निचिते, सहायक फौजदार रमेश पासी, शिपाई शरद मुकुंदे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/१३/२०२४ ०८:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: