शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी
पुणे : ज्या दुकानात हार्डवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता त्याच दुकानातून ४ लॅपटॉप आणि अन्य साहित्य लांबवून पसार झालेल्या एकाला अटक करण्यात शिवाजीनगर पोलीसठाण्याच्या सायबर क्राईम पथकाला यश आले आहे.
समीर रामनाथ थोरात, वय ३९ वर्षे असे या आरोपीचे नाव आहे. दुकानाचा मालक दुबईला गेला असताना त्याने हा डल्ला मारला आहे.
या प्रकरणी दुकान मालकाने पोलिसात तक्रार दिली असून त्यावरून मिळालेल्या माहितीनुसार त्याने आरोपी थोरातला सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या काळात नोकरीस ठेवले होते. दुकानमालक दुबईला गेल्याची संधी साधून थोरात याने दुकानातील ४ लॅपटॉप व इतर साहित्य आणि ग्राहकांकडून घेतलेले साहित्य असा ऐवज घेऊन तो पसार झाला. दुकान मालकाने शिवाजीनगर पोलीसठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून थोरात याच्याविरुद्ध ४५/२०२४ क्रमांकाने भादंवि ४२०, ४०८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. सायबर क्राईम पथकाने आरोपी अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर परिसरात वावरत असल्याचा शोध लावला.त्यानंतर ८ मार्च रोजी पोलीसपथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याक्ष्च्याकडून १ लाख ४० हजार रुपयांचे लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत.
ही कामगिरी अपर आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर प्रवीणकुमार पाटील, उपआयुक्त, परिमंडळ - १,संदिपसिंह गिल, सहायक आयुक्त, विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शिवाजीनगर चंद्रशेखर सावंत यांचे नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक बाजीराव नाईक, अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/११/२०२४ १०:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: