भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत गायन आणि नृत्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील संगीत आणि नृत्याने रसिकांची मने जिंकली !
हा कार्यक्रम इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (पुणे विभागीय कार्यालय) यांनी सादर केला. आय सी सी आर चे संचालक राज कुमार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.अनुप्रिता लेले यांनी सूत्रसंचालन केले.
सानिया पाटणकर यांच्या भारतीय शास्त्रीय गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दुर्गा रागातील बंदीश ' सखी मोरी रूम झूम बादल गरजे ' 'जय भवानी दुर्गे ' तराना आणि 'सकल ब्रिज धून मची ' होली गीत सादर करून रसिकांची मने जिंकली. माधव लिमये यांनी हार्मोनियम तर किशोर बोर्डे यांनी तबल्यावर साथसंगत केली.
आस्था गोडबोले-कार्लेकर यांनी कथक नृत्य सादर केले. 'आदी देव महादेव ', दूर्गा प्रणाम , आमद , गतनिकास , तराना आदी रचना सादर केल्या.संजय आगळे (तबला), अक्षय शेवडे ( पखवाज) , पूर्वा कवठेकर (पढ़न), मेघा तळेकर( गायन) , सुधीर टेकाळे (हार्मोनिअम) यांनी साथसंगत केली.
हा कार्यक्रम रविवार,१७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १९८ वा कार्यक्रम होता.
संगीत आणि नृत्याने रसिकांची मने जिंकली !
Reviewed by ANN news network
on
३/१७/२०२४ ११:२९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/१७/२०२४ ११:२९:०० PM
Rating:

.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: