पुणे : आनंद जेष्ठ नागरिक संघ पोस्टल कॉलनी वाकड अंतर्गत "निशुल्क योगावर्ग"शंकर कलात गार्डन, वाकड येथे नियमितपणे भरत असतो.सकाळी 6 ते 7 हा एक वर्ग योगशिक्षक श्री माधव बरहाटे घेतात तर प्रामुख्याने महिला असलेल्या दुसऱ्या वर्गाची घोडदौड जोरात आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून बॅच फुल झाली आहे.या क्लासच्या योग शिक्षिका सौ रेखा गिरमे असून त्या योगा क्लास अंतर्गत विविध उपक्रम राबवत असतात.
त्यामध्ये नुकतीच एकदिवसीय सहलीचे आयोजन दि १७ मार्च रोजी स्नेह रिसॉर्ट या पर्यटन स्थळी आयोजित केले होते.यात सर्वांचा लक्षणीय उत्साहवर्धक सहभाग दिसून आला.त्याठिकाणी वय विसरून अगदी रेन डान्स सकट प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये सर्वांनी भाग घेतला.सर्वांगीण आरोग्याकडे चाललेली जेष्ठ नागरिक संघाची वाटचाल अत्यंत प्रेरणादायी आहे.
या आयोजनात संघाचे अध्यक्ष श्री भागवत कोल्हे,सचिव श्री बोरकर,श्रीमती संगीता साठे,श्री ज्ञानेश्वर गिरमे,श्री अशोक बोंडे,श्रीमती सुनीता सफाई,सौ हेमांगी बोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
’आनंद’ जेष्ठ नागरिक संघाच्या योगवर्गाची घोडदौड
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२४ ०७:४१:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२४ ०७:४१:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: