शनिवार, ९ मार्च, २०२४

पुणे जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

 


सात्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण फलकांच्या माध्यमातूनही अध्यात्म आणि धर्मप्रसार !

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सनातन संस्थेच्या वतीने सात्विक उत्पादनांचा कक्ष,  ग्रंथ प्रदर्शन, फ्लेक्स प्रदर्शन, फलक लेखन, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन व्याख्याने, भित्तिपत्रके आदी माध्यमातून व्यापक स्तरावर धर्मप्रसार करण्यात आला. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे 40 हून अधिक ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन आणि सात्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते.  शिवपिंडीला अर्ध प्रदक्षिणा का घालावी? भगवान  शिवाची  उपासना कशी करावी ? शिवपिंडीवर बेल किती आणि कसा वाहावा ?याविषयी फलक लेखनाच्या माध्यमातून धर्मशिक्षण देण्यात आले. ग्रंथ प्रदर्शन आणि सात्विक उत्पादनांच्या कक्षाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. पहाटे पासूनच सर्व प्रदर्शन कक्षाला सुरुवात झाली. काही कक्षावर सद्गुरू संतांची वंदनीय उपस्थिती लाभली. 
    या कक्षाला भाविक आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक जिज्ञासूंनी संस्थेचे कार्य जाणून घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा