विठ्ठल ममताबादे
उरण : पॉवर लिफ्टींग स्पोर्टस असोशिएशन रायगड (रजि.) या संघटनेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टींग असोशिएशन मुंबई तर्फे कोकण ज्ञानपीठ इंजिनिअरिंग कॉलेज संकुल कर्जत येथे जिल्हा स्तरीय क्लासिक पॉवर लिफ्टींग स्पर्धा नवोदित, सिनिअर, मास्टर (१,२,३,४) पुरुष व महिला गटासाठी आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत उपस्थित होते. यावेळी के. जी. सी. ई कर्जत कॉलेजचे प्राचार्य डॉ विलास पिल्लेवान, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन मुंबईचे सेक्रेटरी संजय सरदेसाई, पॉ. स्पो. असोसिएशन रायगड अध्यक्ष गिरीष वेदक, पॉ. स्पो. असोसिएशन रायगड कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सचिव- अरुण पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर जिल्हास्तरीय क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.यावेळी व्यायामाचे महत्व विशद करून सर्व स्पर्धेतील उमेदवारांना महेंद्र घरत यांनी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा