गुरुवार, २८ मार्च, २०२४

नदीपात्रात राडारोडा टाकणार्‍यांवर महापालिकेची कारवाई

 


पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील नदीकिनारी राडारोडा टाकणार्‍या ९ वाहनांवर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने कारवाई करून १ लाख १५ हजार रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती पालिकेच्या पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.

महापालिका हद्दीत नदीकिनारी राडारोडा टाकला जात असल्याच्या तक्रारीत वाढ झाल्याने पर्यावरण विभागाने ८ ते २१ मार्च या कालावधीत ही कारवाई केली. यामध्ये (१) श्री.शिवा राठोड (वाहन क्र.के.ए.३३/टी.बी.२३२२), (२) श्री.उमेश बारणे (वाहन क्र.एम.एच.१४/जे.एल.९०८५), (३). श्री. वेदांत देसाई (वाहन क्र.के.ए.३३/के.ए.२१०५), (४) श्री.आर.डी.वाघोले (वाहन क्र.एम.एच.१४/डी.एम. ६४३२, एम.एच.१२/टी.एल.०८७२), (५) श्री. तेजस उक्के (वाहन क्र.एम.एच.२०/सी.आर.२१९१,/एम.एच.१४/एल.ए.८३२८), (६) श्री. प्रकाश चौधरी (वाहन क्र. एम.एच.१२/क्यु.डब्ल्यु. ११४१), (७) श्री. कांतीलाल खिरु पवार ( वाहन क्र. एम.एच.१४/बी.एम.९८२) यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात आली.

आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, मल्टिपर्पज वर्कर गोरक्षनाथ करपे, ज्युनियर इंजिनियर स्वप्निल पाटील, केमिस्ट श्री. पुष्पराज भागवत, यांनी ही कारवाई केली त्यासाठी पर्यावरण पथक प्रदीप महाले, जगन्नाथ काटे, बाबासाहेब ढोकळे, तसेच एमएसएफ व मेस्को जवानांचे पथक यांनी साह्य केले.

यापुढेही कोणी नदीनाल्यांच्या बाजूने राडारोडा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिकेच्या पर्यावरण विभागाने दिला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा