विठ्ठल ममताबादे
उरण : रामशेठ ठाकूर कॉम्प्लेक्स येथे केमिस्ट असोसिएशन उलवे आणि ASA टेनिस अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.
आरोग्य आणि स्पोर्ट्स मधील कार्यक्रमात फार्मासिस्ट, डॉक्टर्स,वकील , उद्योजक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील ५० महिला उपस्थित होत्या.कार्यक्रम प्रमुख मार्गदर्शिका ऍड.प्रतिभा पाटील, डॉ.दिपाली गोडघाटे , अलका मॅडम,ऍड.शिल्पा बंगार, डॉ.प्रियांका शेडगे,प्रतिभा मढवी ,वूमन पॉवर ऑफ केमिस्ट असोसिएशन उलवेच्या सर्व पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.कार्यक्रम च्या प्रास्ताविक मध्ये ऍड.प्रतिभा पाटील यांनी आपल्या आरोग्य साठी शारीरिक व्यायाम किती महत्वाचे आहे हे पटवून दिले.
टेनिस कोच अल्पेश गायकवाड , शेखर टोम्पे यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले .टेनिस कोच अनिकेत वाघमारे यांचे या कार्यक्रमाला सहकार्य मिळाले.फार्मासिस्ट आशा चव्हाण, फार्मासिस्ट प्राजक्ता गोंधळी, पौर्णिमा शेडगे यांनी कार्यक्रम कसा झाला याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.फार्मासिस्ट धनश्री शिंदे ही गेम्स मध्ये विजेती झाली.सर्व फार्मासिस्ट महिला डॉक्टर्स वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला एकाच ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी झाले होते .कार्यक्रम करता वूमन पॉवर ऑफ केमिस्ट असोसिएशन उलवेच्या नेतृत्व करणाऱ्या व्हॉइस प्रेसिडेंट किरण जाधव , प्रिया पवार , खूशी शेख, ज्योती वर्मा,सोनल पाटील यांनी उत्तम नियोजन केले.विशेष आभाराचे मानकरी निकिता गाडघे ठरल्या. महिला फार्मासिस्ट च्या हितासाठी पुढेही असेच वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतील असे मत केमिस्ट असोसिएशन उलवे च्या अध्यक्षा सीमा सुभाष पाटील यांनी मांडले.
Reviewed by ANN news network
on
३/१३/२०२४ ०४:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: