रेल्वे सुरक्षा दल आणि साथी संस्था यांनी पुनर्वसन केलेल्या बालकांना बजाज संस्थेकडून शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात

 


पुणे : पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय आणि साथी संस्था तसेच विभागीय सुरक्षा आयुक्त (रेल्वे सुरक्षा दल)यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील इंद्रायणी सभागृहामध्ये वर्ष २०२२-२०२३ या कालावधीत साथी संस्था, रेल्वे सुरक्षा दल तसेच जीआरपी यांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकात वाचवण्यात आलेल्या बालकांचे व  त्यांचे पुनर्वसन करण्यात येत असलेल्या या बालकांसाठी शैक्षणिक सहाय्यता कार्यक्रम पार पडला.

यावेळी पुणे येथील बजाज संस्थेकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत मुलांना शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले आणि उर्वरित शाळेची फी भरण्यासाठी धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली.

साथी संस्था ही रेल्वे स्थानकात हरवलेले, घरातून पळून आलेले तसेच विनापालक आढळून आलेल्या बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने त्यांच्या घराचा शोध घेऊन त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्याचे कार्य करत आहे.


यावेळी पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री बृजेश कुमार सिंह, विभागीय सुरक्षा आयुक्त श्री.ज्योति मनी, बजाज CSR च्या कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती लिना राजन, बजाज CSR च्या श्रीमती योजना पळसे, बाल कल्याण समितीच्या सारिका अगज्ञान, साथी संस्थेचे डायरेक्टर श्री. बसवराज शाली, बोर्ड मेंबर डॉ. विनीत रायचूर, संस्थेचे कर्मचारी तसेच २९ मुले आणि त्यांचे पालक कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी बोलताना मान्यवरांनी उपस्थित बालक व पालकांना मार्गदर्शन केले, तसेच पालक व मुलांनी त्यांचे अनुभव सांगितले.

संस्थेच्या वतीने मान्यवरांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या समुपदेशक कु.अनीता वायळ यांनी केले आणि शेवटी संस्थेचे कार्यक्रम समन्वयक श्री राजविर सिंह  यांनी सर्वांचे आभार मानले.
रेल्वे सुरक्षा दल आणि साथी संस्था यांनी पुनर्वसन केलेल्या बालकांना बजाज संस्थेकडून शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात रेल्वे सुरक्षा दल आणि साथी संस्था यांनी पुनर्वसन केलेल्या बालकांना  बजाज संस्थेकडून शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात Reviewed by ANN news network on ३/२३/२०२४ ०३:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".