ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेरूर तर्फ हवेली, ता. कुडाळ येथील वनपालाला १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ मार्च रोजी 'रंगेहाथ' पकडले आहे.
या प्रकरणी एका लाकूड व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली होती.अनिल हिरामण राठोड असे अटक करण्यात आलेल्या वनपालाचे नाव आहे.
तक्रारदाराने तुळसुली, ता. कुडाळ येथील एका महिलेच्या मालकीची झाडे वनखात्याची परवानगी घेऊन तोडली होती. त्याची वाहतूक करण्यासाठी परवाना मिळावा म्हणून त्याने वनपाल कार्यालयात १५ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता.परवाना देण्यासाठी लाकुडतोड व वाहतूक परवाना देण्यासाठी आरोपी राठोड याने तक्रारदाराकडे २० हजार रुपये लाच मागितली. तक्रादराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. खात्याच्या पथकाने सापळा रचून राठोड याला १ मार्च रोजी १५ हजार रुपये घेता पकडले.
त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ संशोधन २०१८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सिंधुदुर्ग येथीलपोलीस उपअधीक्षक अरूण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा