गुरुवार, २८ मार्च, २०२४

विजय शिवतारे- अजित पवार वादात देवेंद्र फ़डणवीस यांची मध्यस्थी; अखेरीस दिलजमाई! (VIDEO)

 


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जळजळीत टीका करत बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करणार्‍या माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अखेर आपली तलवार म्यान केली आहे. आपल्याच पक्षाचे सर्वोच्च नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दाद न देणार्‍या शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईला मान दिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

काल  दि. २७ मार्च रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह शिवतारे यांची बैठक झाली.या बैठकीत त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. फडणवीस यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा