खेड: शहरातील एका तरुणाला सेक्सटॉर्शन करून आर्थिक मोबदल्यासाठी ब्लॅक मेल करणाऱ्या भामट्याला राजस्थान मधील फतेहपुर येथून ताब्यात घेण्यात खेड पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे
संशयित आरोपी हा "सेक्सटॉर्शन" च्या माध्यमातूनच आपला उदरनिर्वाह करत असल्याचे पोलिसांना तपासामध्ये आढळून आले आहे. मेहजर अली इकबाल हुसैन (रा. फतेहपुर, ता. पहाडी जिल्हा डिग, राजस्थान ) असे या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. शहरातील एका व्यक्तीस संशयिताने व्हाट्सअॅप व्हाईस कॉल करून संभाषण संपताच त्यांचे संगणकाचा उपयोग करून बदल घडवून आणण्यात आलेले फोटो पाठविण्यात आले आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले. दरम्यान घाबरलेल्या तक्रारदार तरुणाने संशयिताने मागितल्या प्रमाणे गुगल पेच्या माध्यमातून दोनवेळा प्रत्येकी १५ हजार प्रमाणे तीस हजार रुपयाची रक्कम दिली. मात्र या प्रकरणी संबंधित तक्रारदाराने येथील पोलिसांत तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय
अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर व पथकाने तपासाला गती देत
संशयिताला केलेल्या ऑनलाईन मनी ट्रान्सफरचा तपास करण्यात आला. या तपासामध्ये राजस्थान मधील फतेहपुर येथील संशयित आरोपी मेहजर अली इकबाल हुसैन या व्यक्तीचे नाव समोर आले. खेड पोलीसांनी आरोपीच्या ठाव ठिकाणा बाबत गोपनीय माहिती काढली व संशयिताला सोमवारी (४) ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा करण्यासाठी संशयित आरोपी कडून वापरण्यात आलेले दोन मोबाईल फोन व चार विविध मोबाईल कंपनीचे सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.
Reviewed by ANN news network
on
३/०५/२०२४ ०८:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: