रविवार, ३ मार्च, २०२४

दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

 


लोणावळा : पाच वर्षांपूर्वी लोणावळा परिसरात दरोडा घालून फरार झालेल्या एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात लोणावळा येथील पोलीस उपाधिक्षक सत्यसाई कार्तिक आणि त्यांच्या पथकाला यश आले आहे.

मतीन रशीद शेख (वय 38, रा. पुणे) असे या आरोपीचे नाव आहे.

लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथे सन 2019 मध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 153/19 मधील फरार आरोपी मतीन शेख हा १ मार्च रोजी लोणावळा रेल्वे मैदान परिसरात येणार आहे अशी माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्यामुळे ते आणि त्यांचे सहकारी सकाळपासूनच त्या परिसरात दबा धरून बसले होते. दुपारी चारच्या सुमारास शेख तेथे आला. पोलिसांनी त्याची ओळख पटताच त्याला ताब्यात घेतले.

त्याला पोलिसीखाक्या दाखवताच त्याने आपले नाव मतीन रशीद शेख  असल्याचे सांगून लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथे सन 2019 मध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजिं न. 153/19 भादवि कलम 395, 120(ब) या दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असल्याची कबुली दिली. पोलीस पथकाने त्याला लोणावळा पोलीसठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक निरीक्षक सचिन राऊळ, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, कॉन्स्टेबल रईस मुलाणी या पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा