पुणे : भारतीय जनविकास आघाडी पुरस्कृत महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची कार्यशाळा दि.२१ मार्च रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सकाळी १० वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघ,गांजवे चौक, पुणे येथे होणार आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल आणि अध्यक्षस्थानी आघाडी प्रमुख भाऊसाहेब बावणे असतील अशी माहिती मुख्य संयोजक राजेंद्र वनारसे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.या वेळी शिवशक्ती भीमशक्ती संघटनचे अध्यक्ष शिवाजीराव मस्के, बाहुबली जनता पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब साबळे (लमाण), अखिल भारतीय बंजारा सेना पार्टीचे अध्यक्ष डॉ.कांतीलाल नाईक,आगरी सेनेचे अध्यक्ष जयेंद्र खुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. या वेळी आघाडीतील राजकीय पक्ष आणि जनसंघटनांतील सर्व पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी वेळेवर यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.याच ठिकाणी कार्यशाळेतील उपस्थितांची बैठक होईल आणि पत्रकार परिषदही होणार आहे.
Reviewed by ANN news network
on
३/१९/२०२४ ०८:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: