बुधवार, ६ मार्च, २०२४

दोन हजार रुपयांची लाच घेताना तलाठी अटकेत



राजगुरुनगर तलाठी कार्यालयातील प्रकार

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील तलाठ्याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ४ मार्च रोजी 'रंगेहाथ' पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पुणे कार्यालयातील पथकाने केली.

बबन कारभारी लंघे, वय ४६ वर्ष, तलाठी राजगुरुनगर ता. खेड, जि. पुणे असे पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

या प्रकरणी एका ३७ वर्षांच्या पुरुषाने तक्रार दिली होती. तक्रारदार आणि त्याच्या मित्राच्या पत्नीने १ गुंठा जागा सामायिकरित्या खरेदी केली होती. त्याची नोंद महसूल दप्तरात करून सातबाराचा उतारा देण्यासाठी लंघे याने १५ हजार रुपयांची लाच मागितली. वाटाघाटींनंतर २ हजार रुपये घेणे मान्य केले. दरम्यान याची तक्रार जागा खरेदी करणार्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. खात्याच्या पथकाने सापळा लावला आणि लंघे याला ४ मार्च रोजी लाच स्वीकारताना 'रंगेहाथ'पकडले.

त्याच्यावर खेड पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षकअमोल तांबे,अपरअधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा