पुणे : पुणे जिल्ह्यातील करूज, वडगाव मावळ येथील तलाठ्याला अॅन्टीकरप्शन खात्याच्या पथकाने २५ हजार रुपयांची लाच घेताना १८ मार्च रोजी रंगेहाथ पकडले.त्याच्यावर वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अॅन्टीकरप्शनचे उपाधिक्षक नितीन जाधव यांनी ही माहिती दिली.
सखाराम कुशाबा दगडे, वय ५२ वर्षे असे पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात एका ४० वर्षांच्या पुरुषाने तक्रार दिली आहे.
तक्रारदाराच्या शेतीच्या गटाची फोड केल्याची नोंद सातबाराला करावयाची होती. हे काम करण्यासाठी सखाराम दगडे याने ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने अॅन्टीकरप्शन खात्याकडे तक्रार केली. अॅन्टीकरप्शनच्या अधिकार्यांनी १८ मार्च रोजी सापळा रचला आणि वडगाव मावळ येथे जुन्या मुंबई पुणे महमार्गालगत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरानजिकच्या मोकळ्या जागेत सखाराम दगडे याला त्याने मागितलेल्या ५० हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई अॅन्टीकरप्शनचे अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४, अॅन्टीकरप्शन ब्युरो, पुणे - दूरध्वनी क्रमांक - ०२० - २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३, व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे - ७८७५३३३३३३ ४) व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई - ९९३०९९७७००, ई-मेल आयडी - पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in यावर संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.
Reviewed by ANN news network
on
३/१९/२०२४ ११:५७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: