पुणे : पुण्यात दहशत असलेल्या एका सराईत गुंडाच्या मुसक्या आवळण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. हा गुंड मोक्का कारवाई आणि दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक करू नये म्हणून मागील १० महिन्यांपासून फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.
बिपीन उर्फ लखन खंडागळे वय ३३ वर्षे, रा. स.नं.१२,अशोकनगर, येरवडा, पुणे असे या गुंडाचे नाव आहे.
२६ जून २०२३ रोजी अण्णाभाऊ साठे वसाहत येथे एका गुंडांच्या टोळीने तेथे आपल्या मित्रंसोबत थांबलेल्या एका व्यक्तीला शस्त्राचा धाक दाखवून लुटले होते.
या प्रकरणी सहकारनगर पोलीसठाण्यात १४५/२०२३ क्रमांकाने भारतीय दंड संहिता कलम ३९५, ३२३,४५२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ४२७,५०४, ५०६, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५, मपोकाक. १४२ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सिध्दार्थ गायकवाड, राम उमाप, सनी परदेशी, अमोल बनसोडे, समीर शेख,व त्यांचे साथीदार अशा १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. तर लखन खंडागळे फरार झाला होता.
६ मार्च रोजी तो आण्णाभाऊ साठे वसाहत सहकारनगर येथील अरण्येश्वर मंदीराजवळ आपल्या मित्राची वाट पहात थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी ततातडीने तेथे जाऊन त्याला अटक केली.
त्याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष मकोका न्यायाधीश) पुणे यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १२ मार्च पर्यंत पोलीसकोठडी दिली आहे.
या गुन्हयाचा अधिक तपास स्वारगेट विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, उपायुक्त परिमंडळ - २,स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी, वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीसठाणे तपासपथकाचे उपनिरीक्षक सुरज गोरे, सहायक उपनिरीक्षक बापू खुटवड,अंमलदार अमोल पवार,किरण कांबळे, बजरंग पवार, संजय गायकवाड, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, निलेश शिवतारे, विशाल वाघ, सागर सुतकर यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/०९/२०२४ ०१:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: