लोणावळा : लोणावळा शहरातील दोन आणि ग्रामीण हद्दीतील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे चाललेल्या हुक्कापार्लरवर १६ मार्च रोजी रात्री सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक आणि त्यांच्या पथकाने छापे घालून ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रुस्तम वकील अहमद (वय 22 वर्षे, रा.लोणावळा), रोशन मनोज यादव (वय 30 वर्षे, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, तुंगार्ली, लोणावळा), कृष्णा नाथा राठोड (वय 31 वर्षे, रा. कालेकर मळा, लोणावळा), प्रताप कृष्णा डिंमळे (वय 42 वर्षे, रा. कार्ला, ता. मावळ) व बिपीन्छु मार परमेश्वर महतो (वय 30 वर्षे, रा. भारती अपार्टमेंन्ट फ्लॅट नं.202 साईबाबा मंदीराजवळ शांतीनगर उल्हासनगर, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
लोणावळा शहर पोलिसांच्या हद्दीत हॉटेल युटोपिया हाय आणि हॉटेल कुमार रिसॉर्ट तसेव लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत हॉटेल बैठक ढाबा येथे अवैध हुक्कापार्लर चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सत्यसाई कार्तिक यांनी आपल्या पथकासह तेथे छापे घातले.
वरील पाचहीजणांच्या विरोधात सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वित्तरण, विनीमय) अधिनियम 2003 चे सुधारित अधिनियम 2018 चे कलम 4 (अ) व 21 (अ) सह भादंवि कलम 188, 34 अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, रोहन पाटील,हवालदार अंकुश नायकुडे, नाईक सचिन गायकवाड, कॉन्स्टेबल सुभाष शिंदे, अंकुश पवार, गणेश येलवंडे, काळे, टकले, माळवे, पवार, चवरे, शिंदे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा