खेड:येथील तालुका कब्बड्डी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच भरणे येथील नवभारत हायस्कूलच्या सभागृहामध्ये अध्यक्ष सतीश चिकणे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्पर्धेत निवड झालेल्या, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, संघ व्यवस्थापक, पंच, स्पर्धा आयोजक मंडळे यांच्या विशेष अभिनंदनाचा ठराव सभागृहाच्या वतीने करण्यात आला.
खेड तालुका कबड्डी असोसिएशनची सन २०२४ ते २९ या पंचवार्षिक कलावधीसाठी नवीन कार्यकारणी स्थापन करण्याबाबत सभागृहात चर्चा करण्यात आली. यावेळी एकमताने नूतन कार्यकारणी बिनविरोध करण्याचे निश्चित करण्यात आले. यामध्ये अध्यक्षपदी सतीश चिकणे, कार्याध्यक्ष म्हणून महेश विठ्ठल भोसले, उपाध्यक्ष आनंद हंबीर, व सुभाष आंबेडे, सचिव म्हणून रवींद्र बैकर, खजिनदार पदी दाजी राजगुरू, खजिनदार, सहसचिव शरद भोसले, अँड.संदेश चिकणे- कायदेशीर सल्लागार तर दिलीप कारेकर व दिपक यादव यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. महिला प्रतिनिधी म्हणून तेजाताई बैकर व संपदा गुजराती तर सदस्य म्हणून स्वप्नील सैतवडेकर, सुजित फागे, महेश मर्चंडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे सर्व सभासद, सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा