पिंपरी : शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)- राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे मावळचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) पिंपळेगुरव येथील भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. चिंचवड परिसरात प्रचाराला सुरुवात केली.
महायुतीकडून उमेदवारी जाहीर होताच खासदार बारणे यांनी लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक शशिकांत कदम, उद्योजक रवि नामदे उपस्थित होते. खासदार बारणे यांनी जगताप यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली. आमदार अश्विनी जगताप, शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासोबत संवाद साधला. लक्ष्मणभाऊंच्या आठवनींना उजाळा दिला.
दरम्यान, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे हे उद्या रविवारी तळेगावदाभाडे येथे जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके तसेच भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे समजते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: