डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी सुरेंद्र घुडे, देवेंद्र पाटील आणि दिलीप रेडकर यांची निवड
शाहू, फुले, आंबेडकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषणसाठी कोंडयेतील ‘भाकर’ संस्थेची निवड
रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2019-20 साठी घुडे वठार येथील सुरेंद्र घुडे, 2020-21 साठी देवेंद्र पाटील कोंडये आणि 2022-23 साठी कुवारबाव येथील दिलीप रेडकर यांची निवड करण्यात आली. तसेच लांजा तालुक्यातील कोंडये येथील भारतीय कष्टकरी रयत संस्था ‘भाकर’ या संस्थेची डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार 2021-22 साठी व शाहू फुले आंबेडकर पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने याबाबत आज शासन निर्णय प्रसिध्द केला आहे. 15 हजार रुपये प्रती व्यकती, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र, 25 हजार प्रती संस्था असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे तर शाहू फुले आंबेडकर पारितोषिक प्रत्येकी दोन संस्था 7.50 लक्ष,सन्मानपत्र मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे स्वरुप आहे.
मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर पर फॉर्मीग आर्टस (एन सी पी.ए)शजमशेद भाभा नाट्यगृह, नरीमन पॉईअ येथे 12 मार्च सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
Reviewed by ANN news network
on
३/०८/२०२४ ०८:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: