घोडबंदररोड परिसरात स्पामध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा, स्पा मालकीण, मॅनेजर अटकेत! (VIDEO)
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारील कासारवडवली पोलीसठाण्याच्या हद्दीत घोडबंदररोड परिसरातील आनंदनगर भागात असलेल्या एम. के. प्लाझा बिल्डींगमध्ये असलेल्या वेलनेस थाई स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा घातला असून स्पा ची मालकीण आणि मॅनेजर या दोघांना अटक केली आहे. तसेच येथे देहविक्रय करणार्या य तरुणींना ताब्यात घेतले असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सुधारगृहात पाठविले जाईल.
या स्पामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती ठाण्यातील समाजसेवक डॉ. बिनू व्हर्गीस यांनी झोन ५ चे डीसीपी अमर जाधव यांना दिली होती. त्या माहितीस अनुसरून चितळसर, ठाणे मानपाडा आणि कासारवडवली येथील पोलीसठाण्याच्या पथकांनी बोगस ग्राहक पाठवून खात्री करत तेथे छापा घातला.हा व्यवसाय गेली २ वर्षे बिनबोभाट चालू होता.
स्पा ची मालकीण आणि मॅनेजर या दोघांना अटक करण्यात आली असली तरी ज्या जागेत हा प्रकार चालू होता त्याचा मालक फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आरोपींवर भादंवि कलम ३७० (२), ३४ आणि पिटा कायदा कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अॅडीशनल सीपी डॉ. महेश पाटील, झोन ५ चे डीसीपी अमर जाधव, कासारवडवली पोलीसठाण्याअचे सिनिअर पीआय सुनील पाटील, चितळसर पोलीसठाण्याचे एपीआय आर. जी. वेंगुर्लेकर आणि पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: