पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. इ वेस्ट पासून तयार केलेली वैज्ञानिक मॉडेल्स व शोच्या वस्तू ,विविध वैज्ञानिक खेळणी, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी केलेले पी.पी. टी. प्रेझेंटेशन सादरीकरण,
विज्ञान गीत, वर्ग पातळीवर प्रयोग सादरीकरण स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी प्रयोग सादरीकरण स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांपैकी उत्कृष्ट प्रयोगांचे प्रदर्शन नवीन मराठी शाळेत भरविण्यात आले होते.मानसशास्त्रज्ञ समुपदेशक,Nurture your child या समुपदेशन केंद्राच्या संचालिका चैताली कुलकर्णी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन,दीप प्रज्वलन व सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना, "आपली जिज्ञासा जागृत ठेवून प्रत्येक गोष्टीत वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवा, विज्ञानाची कास धरा, देशाची प्रगती करा." असे सांगितले.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले.
पवनचक्की,सूर्यचूल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेततळे, ठिबक सिंचन ,जलचक्र, सूर्यमाला,बिजांकुरणतरंगणे-बुडणे, पाण्याची घनता, हवेचा दाब, प्रकाशाचे अपवर्तन, आंतरेंद्रिये ,फुफ्फुसाचे कार्य अशी विविध मॉडेल्स प्रयोग सादर केले.
त्यांनी मांडलेल्या विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिक सादरीकरण प्रदर्शनाचे प्रमुख अतिथी चैताली कुलकर्णी व मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शाळेतील गायन शिक्षिका विभावरी चिटणीस यांनी लिहिलेल्या विज्ञान गीताचे इ.१ ली ते ४ थी मधील गीतमंचाच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. प्रमुख अतिथी चैताली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टीसाठी गुगलचा वापर न करता आपल्या मेंदूचा जास्तीत जास्त वापर करा अशा आशयाची गोष्ट सांगितली व सर्व बालवैज्ञानिकांनी सादर केलेल्या प्रयोगांचे खूप खूप कौतुक केले. मान्यवरांच्या हस्ते बाल वैज्ञानिकांना बक्षिसे देण्यात आली.
शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांनी सर्वांना विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाची माहिती सांगितली.
मनीषा कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रिया मंडलिक अतिथी परिचय करून दिला व आभार मानले.
तनुजा तिकोने, धनंजय तळपे यांनी नियोजन सहाय्य केले.
शाळेत भरविण्यात आलेली विज्ञान प्रयोग प्रदर्शनी पुढील २ दिवस पालकांसाठी देखील खुली असणार आहे अशी माहिती मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी दिली.
Reviewed by ANN news network
on
२/२८/२०२४ ०९:२२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: