पिंपरी : लेखक डॉ. ओमेंद्र रत्नु यांनी लिहिलेल्या आणि चारूचंद्र उपासनी यांनी मराठी अनुवाद केलेल्या 'महाराणा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (दि.३) सकाळी १०:३० वाजता, आर्य समाज पिंपरी कॅम्प येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
आर्य समाज पिंपरी, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान पुणे व शिव समर्थ सेवा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला आहे. हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तसेच भाजपाचे शहर अध्यक्ष शंकर जगताप, शिवशंभो विचार मंचचे प्रांत संयोजक हभप शिरीष महाराज मोरे, आर्य समाज पिंपरीचे पदाधिकारी मुरलीधर सुंदरानी आणि हरेश तिलोकचंदानी, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे पंडित धर्मवीर आर्य सचिव उत्तम दंडीने आदी उपस्थित राहणार आहेत. प्रकाशनापूर्वी १० वाजता हवन होणार आहे या वेळी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
'महाराणा' चे शनिवारी आर्य समाज पिंपरी येथे प्रकाशन
Reviewed by ANN news network
on
२/०२/२०२४ १२:३३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
२/०२/२०२४ १२:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: