पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने मोक्का गुन्ह्यात 'वॉन्टेड' असलेल्या एका गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून पिस्तूल हस्तगत केले आहे.
जतिन उर्फ सोनू बिपीन टाक वय २९ राहणार सुभाषनगर, रिव्हररोड, झुलेलाल मंदीराजवळ, पिंपरी असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरीचोरी, मारामारी, शस्त्र कायद्याचे उल्लंघन, दुहेरी मोक्का असे १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.पोलीस कॉस्टेबल अजित सानप यांनी सरकार तर्फे त्याच्याविरोधात तक्रार दिली असून त्यावरून पिंपरी पोलीसठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०२३ साली गणेश विसर्जनाच्यावेळी त्याने रोहीत भगवान वाघमारे राहणार मिलींदनगर, पिंपरी याला पिस्तूल लावून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी वाघमारे याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. तो त्याच्या घराजवळ आला असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्वरेने तेथे जात त्याला ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त (गुन्हे) सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक केराप्पा माने, सहायक फौजदार दिपक खरात, दिलीप चौधरी, जमीर तांबोळी, विपुल जाधव, नामदेव कापसे, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा