दापोली : दापोलीतील प्रतिथयश वृत्तपत्र विक्रेता आणि मंडप डेकोरेटर बलवंत क्रांतिकुमार फाटक यांचे आज दि. ४ फेब्रुवारी रोजी पहाटे अल्प आजाराने निधन झाले.
दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर बनली. आणि त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात त्यांच्या मातु:श्री आणि दोन विवाहित भगिनी आहेत.
बलवंत फाटक हे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र सुपरिचित होते. त्यांचा लोकसंग्रह दांडगा होता. त्यांच्या अकाली निधनामुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बलवंत फाटक यांचे निधन
Reviewed by ANN news network
on
२/०४/२०२४ १२:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: