पुणे : जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे आज १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित या जन्मोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.
सकाळी सव्वाआठच्या सुमारास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री किल्ले शिवनेरी येथे दाखल झाले. शिवजन्मोत्सवाचा पाळणा झाल्यानंतर त्यांनी पालखीच्या ठिकाणी जाऊन वंदन केले. त्यानंतर पोलीस पथकाने शिवरायांना मानवंदना दिली.
शासकीय जन्मोत्सव पार पडल्याशिवाय शिवभक्तांना गडावर प्रवेश मिळत नसल्याने. शासकीय कार्यक्रम सकाळी १० ऐवजी लवकर घेण्याची सूचना मागील वर्षी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली होती. त्यास अनुसरून यंदा हा सोहळा सकाळी लवकर घेण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: