रत्नागिरी : राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने आज २०२०, २०२१ व २०२२ करिता विविध कृषी पुरस्कार जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांचा समावेश आहे.
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०२१ साठी विनायक श्रीकृष्ण महाजन मु पो कुडावळे ता दापोली, युवा शेतकरी पुरस्कार २०२१ साठी अनिल हरिश्चंद्र शिगवण मु कुंभवे पो साकळोली ता दापोली,
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)२०२१ साठी हेमंत यज्ञेश्वर फाटक मु चिंचखरी ता रत्नागिरी,
युवा शेतकरी पुरस्कार २०२२ साठी मिथिलेश हरिश्चंद्र देसाई मु पो लांजा ता लांजा, उद्यानपंडित पुरस्कार २०२२ साठी अजय रविंद्रनाथ तेंडूलकर मु पो डोर्ले ता रत्नागिरी आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)२०२२ साठी संतोष शांताराम वाघे मु पो निर्व्हाळ ता चिपळूण यांची निवड झाली आहे.
सन २०२१ चा युवा शेतकरी पुरस्कारासाठी निवड झालेले शेतकरी अनिल हरिश्चंद्र शिगवण यांचे पुष्पगुच्छ देऊन तालुका कृषी अधिकारी दापोली उमेश मोहिते यांनी अभिनंदन केले.
Reviewed by ANN news network
on
२/२३/२०२४ १०:१८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: