विठ्ठल ममताबादे
उरण : रयत शिक्षण संस्थेच्या, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा .पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई, ता. उरण,जि.रायगड. या विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.त्यांच्या हस्ते आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण घाग आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन केले गेले.
त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाचे आयोजन पाचवी अ च्या वर्गाने व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पी.जे. घरत, एम.के. घरत यांनी उत्कृष्टपणे सादरीकरण केले. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक धनाजी म्हात्रे यांची रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागात समन्वय समिती सदस्यपदी नेमणूक झाल्याबद्दल दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि. सातारा शाखा - वाशी यांच्यावतीने त्यांचा ट्रॉफी आणि शाल व श्रीफळ देऊन नरेश घरत, सुरेश पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला,तसेच विद्यालयाच्या उपशिक्षिका पी.जे.घरत यांची कन्या आर्या घरत हिने इयत्ता दहावी परीक्षेमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल तिचाही सन्मान बँकेमार्फत करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे रयत सेवक संघाचे समन्वयक व दी रयत सेवक को ऑपरेटिव्ह बँक,साताराचे व्हाइस चेअरमन नुरा शेख यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जासई गावचे सरपंच संतोष घरत, स्कूल कमिटी सदस्य यशवंत घरत,अमृत ठाकूर, बाबुराव मढवी ,सुभाष घरत, गोपीनाथ म्हात्रे,रजनी घरत,जयश्री घरत,योगिता म्हात्रे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: