विठ्ठल ममताबादे
उरण : आत्माराम ठाकूर मिशन संचालित (रजि.) जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे व श्री अंबिका योग कुटीर, ठाणे, शाखा नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील आवरे येथे योग शिबिर झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री अंबिका योग कुटीर ठाणे, नवी मुंबईचे विभागीय संचालक उत्तमराव पवार यांनी केले. यावेळी त्यांनी म्हटले की, योग केल्यामुळे सर्व रोग नष्ट होतात तसेच डॉक्टर कडे जाण्याची गरज नाही. श्री अंबिका योग कुटीरचे संस्थापक हटयोगी निकम गुरुजी यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली. तसेच योगाचा प्रसार व्हावा व सर्व भारत रोग मुक्त व्हावा याच साठी श्री अंबिका योग कुटीरचा प्रयत्न आहे.
आवरे येथे योगशिबिर उत्साहात
Reviewed by ANN news network
on
२/१६/२०२४ १२:२९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
२/१६/२०२४ १२:२९:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: