विठ्ठल ममताबादे
उरण : उरण पोलीस लाईन बॉईज संघटना ही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी सामाजिक संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या देखील सोडविण्यात आले आहेत. उरण शहरात पोलीस वसाहत नागाव रोड येथे दरवर्षी उरण पोलीस लाईन बॉईज संघटनेतर्फे माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे ५ वे वर्ष आहे. सदर संघटनेच्या वतीने माघी गणेशोत्सव निमित्त संघटनेचे अध्यक्ष गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक बांधिलकी जपत पोलीस वसाहतीत गणेशोत्सव मंडपाच्या बाजूला मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. माघी गणेशोत्सवाच्या माध्यमातून उरण पोलीस लाईन बॉईज संघटनेतर्फे वृक्षारोपण करा, झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देण्यात आला.उरण पोलीस लाईन बॉईज संघटनेचे अध्यक्ष गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ कुठार, सदस्य सचिन गोडे,पप्पू सूर्यराव,केशव निकम, हेमंत थवई, महेश पाटील, मंगेश पार्टे आदींनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश माघी गणेशोत्सवच्या माध्यमातून दिला आहे.
Reviewed by ANN news network
on
२/१६/२०२४ ११:०९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: